Thursday, October 8, 2009

माय मरो मावशी जगो

मी मलयाळी असून मराठी माझी मावशी आहे आई सारखी खरं |
आई गेली तरी मावशी जगावी अस तुझ म्हणन किती खर आहे ते मला कळलं ||
शेणानी सारवलेल्या तुझ्या जमीनीला तोचं सुगंध, मझ्या आई सारखा ।
तुझ्या नदीच्या हिरवेगार काठावर बसताना माझ्या आईच्या कुशीत बसल्या सारख वाटत ।
होय! सुरवातीला तुझी भाषा मला कळत नव्ह्ती ।
माझ्या आईचीसुद्धा लहानपणात मला कुठे समजत होती?
मला अजूनही शिरायचे आहे तुझ्या कुशीत झोप येई पर्यंत ।
तुझ्या मायेने खरच मी मझ्या आईला विसरलो मावशी ॥

Friday, May 22, 2009

माझे बाबा

का माझे बाबा आज ऐवढ्या वेळ झोपले?
का उठून आम्हाला ओरडतं नाहीत ?
का सर्व मंडळी झटपट जमली ?
का आज इथे अशी लोकांची गर्दी ?
का कोणी बघताना हसत नाहीत ?
का कोणी कोणाला ओळखत नाही ?
का म्ह्णून दिवा, अगरबत्ती लावली ?
का त्यानां पांढर्‍या चादरीने झाकले ?
का त्यांच्या तोंडातं तुळसीचे पान ?
का त्याना टिळा आणी अक्षता लावले ?
का म्ह्णून बाहेर बांधतात बाम्बू ?
का वस्तु आणायला धावतात काका ?
का अशी जोरात अत्या तू रडतेस ?
का म्ह्णून घेतेस जवळ अशी मला ?
का कोणी त्यांना उठवत नाहीत ?
का त्यांच्या जवळ मला सोडत नाही ?
का असं आईशिवाय वाढवून मला ?
का तुम्ही बाबा आज ऐवढ्या वेळ झोपले ?

Thursday, April 16, 2009

एक पाखरू

एक पाखरू गगना मध्ये
आशा घेउन उडत होतं
त्याला क्षितीज्याच्याही
पलिकडे जायचं होतं
उडता उडता पाहिलं
आला अमृत घेवून वर्षा
ओंलें पंख पसरुन पाखरू
आपले प्रयाण करत होतं
मध्ये दिसला एक थेंब
पावसाचा मोती कण
किती सुन्दर दिसते ती
किती शीतल असेल ती
गेला त्याच्या पाठी पाखरू
ओरडत होतं थांबायला
थांबत नाही पाऊस थेंब
पाखरू पाठी धावताना
चल हे थेंब मेघसुपुत्री
फिरुया आपण गगनातं
किति सुन्दर तू किति निर्मळ तू
ये माझ्या संगती खेळायला
थेंब बोलला थांबुशकतनाही
खाली आहे मझं गती
प्रेम तुझं अपरम्पार तसे मी
मोहित तुझवर खरोखर
पाखरू पाहता थेंब खाली
जातात असं म्हणतं-म्हणतं
प्रेम मझं त्या पाखरू बरोबर
मी पण होईन त्याची सखी
थेंब धावतं अजुनही खाली
पाखरू संगती बोलताना
प्रेम झाल दोघाचं तसेचं ती
थेंब भीडली जमिनीला
छिन्न-भिन्न ती झाली तत् क्षण
खंडित झाले ह्रदय त्याचं
स्तब्ध होऊन, दुःखात जळूनं
पाखरू रडलं जोरानं
दिसला पुन्हा एक थेंब समोर
थांबली तसेच न पडताना
कोण तू विचारलं पाखरू रडत्-रडत्
बोलली ती हळूवार असं
तुझी मी प्रेयसी, राहणार बरोबर
मी तुझ अकक्षीण अश्रु कण ॥